{"product_id":"yugpravartak-narendra-modi-युगप्रवर्तक-नरेंद्र-मोदी","title":"Yugpravartak Narendra Modi ( युगप्रवर्तक नरेंद्र मोदी )","description":"\u003cp\u003eअकरा वर्षात मोदींनी अहोरात्र कष्ट करून सामान्य गरीब भारतीयांच्या जीवनात प्रत्यक्ष सकारात्मक बदल घडवून दाखवले आणि त्यांना दारिद्र्यरेषेच्या बाहेर काढले. मोदींनी गरीब कल्याणाची आणि भारतातील सर्व गोरगरिबांच्या आर्थिक समावेशनाची क्रांती प्रत्यक्षात आणली. भारतीय अर्थव्यवस्थेला जगातील सर्वात वेगाने वाढणारी पाचव्या क्रमांकाची प्रमुख अर्थव्यवस्था बनवून मोदींनी भारतीयांना दिलेल्या आपल्या विकासाच्या वचनाला सार्थ केले, याच वेळी जगभरात वेगाने विकसित होणाऱ्या डिजिटल तंत्रज्ञानातील क्रांतीमध्ये आपले देशबांधव मागे पडू नयेत म्हणून मोदींनी भारतात सर्वव्यापी डिजिटल क्रांती आणली. आपल्या देशातील राज्यकारभार भ्रष्टाचार विरहित होऊ शकतो हा विश्वास मोदींनी भारतीय जनतेच्या मनात जागवला. दिवाळखोर पाकिस्तानकडून झालेल्या अतिरेकी हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरमधून थेट पाकिस्तानात घुसून अचूक व प्रचंड विनाशकारी हवाई हल्ल्याने जबरदस्त प्रतिउत्तर देऊन भारतीयांच्या मनात सुरक्षिततेची भावना जागवली. सनातन भारतीय संस्कृतीचा जगभर प्रचार, प्रसार करून मोदींनी जगभरात भारताचा गौरव वाढवला. 'एक भारत श्रेष्ठ भारत'चा नारा देऊन ७० वर्षे रेंगाळलेलं काश्मीरचं भारतातील संपूर्ण विलिनीकरण करून दाखवलं. त्यामुळे नरेंद्र मोदी हे सुद्धा अनेक अर्थाने युगप्रवर्तक आहेत. असा आपला युगप्रवर्तक नेता वयाची ७५ वर्षे पूर्ण करीत असताना या युगप्रवर्तकाच्या ७५ वर्षांच्या राष्ट्रसमर्पित आयुष्याची ओळख करून देणारे हे पुस्तक आहे.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Vinayak Ambekar \/ Agnipankha Publication","offer_id":53620674560299,"sku":null,"price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-05-27at11.51.24AM.jpg?v=1779862984","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/yugpravartak-narendra-modi-%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%97%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%95-%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a6%e0%a5%80","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}