{"product_id":"yugpravartak-chhatrapati-shivaji-maharaj-युगप्रवर्तक-छत्रपती-शिवाजी-महाराज","title":"Yugpravartak Chhatrapati Shivaji Maharaj ( युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज )","description":"\u003cp\u003eशिवाजीराजांपेक्षा जास्त देश जिंकून त्यांच्यावर राज्य करणारे पुरुष जगाच्या इतिहासात पुष्कळ आढळतील; पण त्यांच्याइतका गुणसमुच्चय एका व्यक्तीत एकत्रित झालेला सहसा आढळत नाही. कोणास कधी जहागिरी अगर जमिनी तोडून न देणारे; न्यायाच्या कामात कोणाची भीडमुर्वत न धरणारे; दुष्टांचा काळ पण गरिबांचे कनवाळू, नेहमी मातेच्या वचनात राहून अहर्निश राष्ट्राची चिंता वाहणारे; स्वदेश, स्वभाषा व स्वधर्म या विविध संपत्तींचे संगोपन करणारे; पापभीरू परंतु रणशूर असे हे आधुनिक काळाचे अद्वितीय स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने 'युगप्रवर्तक' होते. छत्रपती शिवरायांच्या तलवारीने मुघली आक्रमणे परतवून लावली. महाराजांच्या लोककल्याणकारी धोरणाने रयत सुखी-समृद्ध झाली, हिंदू धर्माची आणि संस्कृतीची भगवी पताका डौलाने फडकू लागली. वा. कृ. भावे यांनी युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांचे हेच कार्यकर्तृत्व आणि जीवनचरित्र प्रस्तुत ग्रंथात मांडले आहे.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Vasudev Bhave \/ Krishna Publication","offer_id":53646727938347,"sku":null,"price":399.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/shivajimaharaj.png?v=1780663751","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/yugpravartak-chhatrapati-shivaji-maharaj-%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%97%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%95-%e0%a4%9b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}