{"product_id":"you-can-यु-कॅन","title":"You Can ( यु कॅन )","description":"\u003cp\u003e'यू कॅन' हे असे प्रभावी, सकारात्मक विधान आहे, जे तुम्हाला तुमच्या मर्यादा ओलांडायला आणि अकल्पित गोष्टी करायला प्रेरित करू शकते. हे प्रभावी शब्द यशाच्या दिशेने असणाऱ्या तुमच्या प्रवासाची सुरुवात आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक म्हणजे एक मार्गदर्शन पुस्तिका आहे, जी तुम्हाला व्यक्ती म्हणून विकसित व्हायला ऊर्जा देईल. कामाच्या ठिकाणी किंवा घरात तुमच्यासाठी नवीन मार्ग खुले करेल. तुमची सामाजिक कौशल्ये वाढवेल. विचारपूर्वक जोखीम पत्करायला प्रेरणा देईल. तुमचा आत्मविश्वास वाढवेल - त्यामुळे तुम्ही एक उत्तम व्यक्ती बनू शकाल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयू कॅन ही एक शाश्वत कलाकृती आहे, ज्यात व्यवहारचातुर्य काठोकाठ भरले आहे. ती, तुमच्या प्रगतीला साहाय्यक ठरतील अशा व्यावहारिक पद्धतींवर आधारित आहे आणि तुम्ही नेहमीच ज्या उत्कृष्टतेचा ध्यास घेतलेला आहे, ती साध्य करायला तुम्हाला मदत करेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजॉर्ज मॅथ्यू अॅडम्स हे लोकप्रिय लेखक होते. तसेच ते स्तंभलेखक आणि त्या काळातील प्रमुख दैनिकांसाठी हास्यचित्रे आणि स्तंभलेखन करणाऱ्या वृत्तपत्रांचे संस्थापक होते. त्यांच्या टुडेज टॉक या लोकप्रिय सदराने अनेक सर्वोत्तम खपाच्या पुस्तकांसाठी मार्ग प्रशस्त केला, ज्यामुळे अनेकांची आयुष्ये बदलली. अॅडम्सने स्वतःच्या जीवनातील उदाहरणे देऊन प्रेरणेसारख्या संकल्पनेला सुलभ करून दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवले. वेळोवेळी स्तंभलेखन करून जगाला एक आनंदी ठिकाण बनवले.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ George Matthew Adams \/ Dilipraj Prakashan","offer_id":53910208872747,"sku":null,"price":320.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/yucan.png?v=1782202978","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/you-can-%e0%a4%af%e0%a5%81-%e0%a4%95%e0%a5%85%e0%a4%a8","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}