{"product_id":"vicharvedh-विचारवेध","title":"Vicharvedh ( विचारवेध )","description":"\u003cp\u003eआनंद करंदीकर यांनी गेल्या २५ वर्षांत सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक इत्यादी विषयांवर मराठीतील अनेक लोकप्रिय वर्तमानपत्रे व नियतकालिकांतून विश्लेषणात्मक लेख लिहिलेले आहेत. यामध्ये लोकसत्ता, सकाळ, साधना साप्ताहिक, पुरुष स्पंदन, पुरुष उवाच, स्त्री, मिळून साऱ्याजणी, परिवर्तनाचा वाटसरू यांचा समावेश आहे. त्यातील निवडक लेखांचा हा संग्रह. यात युक्रांद चळवळीची गोष्ट, पांढरा समाजवाद, ब्राह्मणांचे पावित्र्य असे विचारधारेविषयीचे लेख आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंभोग कसा सुखाचा, पुरुषांसाठी बलात्कारविरोधी शिक्षण, पॉर्न, मी आणि समाज, भावनिक बुद्धी-पुरुषांचे मागासलेपण असे स्त्री-पुरुष विषयांवरचे लेख आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाणूस कपडे का घालतो, अमेरिकेशी संग देशहिताला बाधा, अल्कायदाची शिकार कोण, एक्झिट पोल अशा विषयांवर चर्चा करणारे लेखही या पुस्तकात समाविष्ट आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरोजगाराचा प्रश्न हा सध्याचा तरुणांसमोरचा सर्वांत ज्वलंत प्रश्न आहे. त्याविषयी काही लेखांतून यात विश्लेषण करण्यात आलं आहे आणि रोजगार निर्मितीविषयी पाऊलवाटही दाखवण्यात आली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसामान्यांच्या प्रश्नांवर करंदीकर यांनी विपुल लेखन केलं आहे. त्यामध्ये आरोग्य, वाहतूक, दुष्काळ यांसारखे विषय आहेत. कुठल्याही एका विशिष्ट वैचारिक 'इझम'मध्ये या पुस्तकातील लेख अडकणार नाहीत. लेखांमध्ये एक सकारात्मकता आहे, लेखांतील संदर्भ आणि आकडेवारीने लेख जड न होता ते सुबोध झाले आहेत. लेखांचा आशय खोल आणि भाषा सोपी आहे. विषय, मुद्दा, अभ्यास, दृष्टिकोन, मांडणी, तर्क, तात्पर्य या क्रमाने पुस्तकातील सगळेच लेख विभिन्न विषयांवर साक्षेपी चिंतन घडवतात. विचार आकाराला येण्यासाठी उपयोगी ठरणारे हे पुस्तक विद्यार्थी, अभ्यासक, सर्व वयोगटांतील नागरिक आणि विभिन्न विषयांतील तज्ज्ञ लोकांनीही वाचायलाच हवे !\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Anand Karandikar \/ Rkishna Publication","offer_id":53649007640875,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/vicharvedh.png?v=1780726417","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/vicharvedh-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a7","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}