{"product_id":"top-visionaries-who-changed-the-world-महान-द्रष्टे","title":"Top Visionaries Who Changed the World ( महान द्रष्टे )","description":"\u003cp\u003e\"या पृथ्वीतलावरील अवकाशात आपल्या अस्तित्वाची खूण तुम्ही मागे ठेवली पाहिजे, अन्यथा तुमचे जीवन व्यर्थ गेले असेच होईल!\"\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्टीव्ह जॉब्ज\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअवघे जग बदलून टाकणाऱ्या प्रतिभावंतांबरोबर संवाद साधावा, त्यांच्या समवेत भोजन करावे, असे तुम्हाला वाटत नाही का? तसे झाले तर तुम्ही तुम्हाला सतावणारे प्रश्न त्यांना विचाराल ! इतकेच नव्हे तर, त्यांच्या जीवन-व्यवसाय शैलीतून तुम्ही स्वतःसाठी मोठी प्रेरणा घेऊ शकाल !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्टीव्ह जॉब्ज, जॅक मा, बिल गेट्स, एलॉन मस्क आणि मार्क झुकेरबर्ग या जागतिक कीर्तीच्या उद्योजकांच्या अत्यंत कष्टप्रद जीवन-व्यवसाय प्रवासातून आपल्याला निश्चितपणे खूप काही सखोल, समृद्ध व स्वतंत्र जीवनशैली व विचारपद्धती गवसू शकते. अशा या प्रभूतींची श्रेष्ठ प्रतीची जीवनपद्धती, मूलगामी विचारशैली तसेच प्रगल्भव्यवसायशैली काळजीपूर्वक समजून घेण्यातच खरा शहाणपणा आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया द्रष्ट्या उद्योजकांनी या जगाचा मौलिक असा पाया रचला! त्यांची बुद्धिमत्ता व निर्मितीक्षमता तसेच कार्पोरेट विचारसरणी आपल्याला निश्चितच लाभदायक ठरणार आहे, यात मुळीच शंका नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजॉर्ज इलियन यांनी डिजिटल इंडस्ट्रीत आपले स्वतःचे असे एक स्थान निर्माण केलेले आहे. जॉर्जनी ई-बुक्सच्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. प्रेरणादायी उद्योग-उद्योजक, त्यांची प्रभावी कारकीर्द याविषयीची अठरा पुस्तके आजवर त्यांनी लिहिले आहेत. स्वमेहनतीने अब्जाधीश झालेल्या उद्योजकांचे प्ररेणादायी विचार, त्यांच्या सवयी व व्यक्तिमत्त्वे आपल्या ओघवत्या शैलीतून तुमच्यासमोर ठेवलेली आहेत. ती मुळातच वाचण्यासारखी आहेत.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ George Ilian \/ Jaico Books","offer_id":53920665534763,"sku":null,"price":185.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/61tbBPd9stL._SY466.jpg?v=1782384238","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/top-visionaries-who-changed-the-world-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%87","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}