{"product_id":"tihar-turungachya-bhintiaada-तिहार-तुरुंगाच्या-भिंतीआड","title":"Tihar Turungachya Bhintiaada  तिहार तुरुंगाच्या भिंतीआड","description":"\u003cp\u003eथरकाप उडवणाऱ्या, मती गुंग करणाऱ्या आणि खिळवून ठेवणाऱ्या सत्यकथा..\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकैद्यांना धडकी भरवणारा आणि सामान्यांचं कुतूहल जागृत करणारा तिहार तुरुंग ! तिहारच्या उंच तटबंदीमागचं जग नेमकं आहे तरी कसं ? रेल्वे प्रशासनातील नोकरीला राम राम ठोकून तिहार तुरुंगात एएसपी म्हणून रूजू झालेल्या सुनील गुप्ता या डोळस, धाडसी, संवेदनशील तरीही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचं हे पुस्तक !'तिहार तुरुंगाच्या भिंतीआड'चं राजकारण, गुन्हेगारांना त्यांच्या 'दर्जा' नुसार मिळणारी वागणूक, कैद्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात उठवलेला आवाज आणि घडवलेल्या सुधारणा, तिहारची अंतर्गत रचना, फाशीचं शास्त्र, अट्टल गुन्हेगारांची दुसरी बाजू या सगळ्यांचं रंजक दर्शन हे पुस्तक घडवतं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक अनेक गौप्यस्फोट करतं :\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआशियातील सर्वांत मोठ्या तुरुंगातील जीवन कसं असतं ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएखाद्या गुन्हेगाराला फाशी दिल्यानंतर दोन तासांनीही त्याची नाडी चालूच असते, तेव्हा काय होतं ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'निर्भया'चा बलात्कारी रामसिंग याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजेसिका लालचा हत्यारा मनू शर्मा याने तिहारमधील कैद्यांचं, पर्यायाने तुरुंगाचं अर्थकारण कसं बदलवलं ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअफजल गुरूच्या फाशीबाबत सरकारने एवढी गुप्तता का पाळली ? अफजल गुरूच्या आठवणीने लेखक सुनील गुप्ता हळवे, भावूक का होतात ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभ्रष्टाचाराविरोधात अख्ख्या देशात रान उठवणारे अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगातील स्थानबद्धता ते त्यांची सुटका ही\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतारेवरची कसरत पार पाडताना जेल प्रशासनाची कशी तारांबळ उडाली ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकैद्यांनी पळून जाण्याच्या फसव्या प्रयत्नांत कोणत्या गमतीजमती घडतात ?\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"Sunil Gupta \/ Sunil Dupta","offer_id":52234916495659,"sku":null,"price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-02-13at7.13.56PM.jpg?v=1770990261","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/tihar-turungachya-bhintiaada-%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%86%e0%a4%a1","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}