{"product_id":"the-race-of-my-life-माझ्या-आयुष्याची-शर्यत-मिल्खा-सिंग","title":"The Race Of My Life ( माझ्या आयुष्याची शर्यत मिल्खा सिंग )","description":"\u003cp\u003eएका विलक्षण तरुणाची प्रेरणादायी कथा ज्यानं आयुष्याकडून किंवा परिस्थितीकडून मात स्वीकारण्यास नकार दिला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमिल्खा सिंगचं आयुष्य म्हणजे धावणं, धावणं आणि धावणंच... लहान वयात फाळणीनंतर उसळलेल्या संहारातून अगदी थोडक्यात झालेली सुटका (त्याच्या कुटुंबातले बहुतेक लोक या मनुष्यसंहारात बळी पडले), पौगंडावस्थेत भरकटत गेलेल्या मिल्खानं चोरी केली पण पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो निसटला, तरुणपणी सैन्यात नोकरी मिळाली तेव्हा आयुष्यातली पहिलीच शर्यत त्यानं जिंकली त्यामागील साधा उद्देश होता काही खास लाभमिळवणे (रोज पिण्यासाठी एक पेला दूध). त्या पहिल्या शर्यतीनंतर मिल्खा क्रीडापटू बनला आणि आयुष्यभर त्यानं तेच बिरुद मिरवलं. त्यानंतरचं त्याचं आयुष्य म्हणजे दंतकथेत शोभाव्यात अशा घटनांची मालिकाच.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमनमोकळ्या शैलीत लिहिलेल्या या आत्मकथेत मिल्खा सिंग आपल्याला त्यांनी मिळवलेल्या पहिल्यावहिल्या सुवर्णपदकाविषयी सांगतात. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला मिळालेलं ते पहिलंच सुवर्णपदक होतं. पाकिस्ताननं त्यांचा गौरव 'उडणारा शिख' या शब्दांत केला तेव्हा त्यांना झालेला अपरिमित आनंद आणि ऑलिम्पिक्स मध्ये सोसावी लागलेली पराभवाची नामुष्की आपल्याला कळते ती त्यांच्या साध्यासुध्या निवेदनातून.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Milkha Singh \/ Jaico Books","offer_id":53920192561451,"sku":null,"price":199.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-06-25at12.57.21.jpg?v=1782372481","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/the-race-of-my-life-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%96%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}