{"product_id":"the-obstacle-is-the-way-द-ऑबस्टॅकल-इज-द-वे","title":"The Obstacle Is The Way ( द ऑबस्टॅकल इज द वे )","description":"\u003cp\u003e'जगातील प्रत्येक लीडरच्या हाताशी असायलाच हवं असं पुस्तक !'\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e- रॉबर्ट ग्रीन, द फोर्टी एट लॉज ऑफ पॉवर आणि मास्टरी या पुस्तकांचे लेखक\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'या पुस्तकातील शिकवण अमलात आणा आणि तुमच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडवा.'\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्टीव्हन प्रेसफिल्ड, द वॉर ऑफ आर्टचे लेखक\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया जगातील महान यशस्वी लोकांकडे कोणती विशेष बुद्धिमत्ता, भाग्य किंवा जगावेगळा अनुभव नसतो. त्यांच्या जगण्याचं एक सूत्र असतं 'मार्गातले अडथळे हाच यशाचा, ध्येयप्राप्तीचा मार्ग असतो'.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे जगण्याचं तत्त्वज्ञान सुमारे २००० वर्षांपूर्वी विकसित झालंय आणि युद्धमैदानावर तसेच कॉर्पोरेट बोर्डरूम्समध्येही ते वापरलं गेलंय.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआंतरराष्ट्रीय ख्यातीचे मार्केटिंग गुरू आणि बेस्टसेलिंग लेखक रायन हॉलिडे द ऑबस्टॅकल इज द वे या पुस्तकात याच तत्त्वज्ञानाची आधुनिक युगात यशस्वी होण्यासाठी पुनर्मांडणी करतात आणि हेही उलगडतात :\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजॉन डी. रॉकफेलरने प्रतिकूलतेतही संधी कशी शोधली आणि मंदीतही तो श्रीमंत कसा झाला?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहात्मा गांधींनी त्यांच्या दुर्बलतेलाच शक्तिस्थान कसे बनवले आणि शक्तिशाली ब्रिटिश साम्राज्याला कसे नमते घ्यावे लागले ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्टीव्ह जॉब्जने अशक्य ते शक्य कसे साध्य केले?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुमचा दृष्टिकोन बदला. तुम्ही परिस्थिती बदलू शकता हे समजून घ्या. तुमच्या कृतींना योग्य दिशा द्या आणि मार्गातल्या प्रत्येक अडथळ्याला, संकटाला संधीत रूपांतरित करा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'हे पुस्तक वाचायलाच हवं. मार्गातल्या अडचणींवर मात करण्याची आणि कोणतीही समस्या सोडवण्याची कला शिकवणारं पुस्तक !' जिमी सोनी, द हफिंग्टन पोस्टचे एम.डी., रोम्स लास्ट सिटिझनचे लेखक\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Ryan Holiday \/ Krishna Publication","offer_id":53693489938731,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/theart.png?v=1781083747","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/the-obstacle-is-the-way-%e0%a4%a6-%e0%a4%91%e0%a4%ac%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%85%e0%a4%95%e0%a4%b2-%e0%a4%87%e0%a4%9c-%e0%a4%a6-%e0%a4%b5%e0%a5%87","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}