{"product_id":"the-little-book-of-awakening-द-लिटल-बुक-ऑफ-अवेकनिंग","title":"The Little Book Of Awakening ( द लिटल बुक ऑफ अवेकनिंग","description":"\u003cp\u003eन्यू यॉर्क टाइम्सच्या बेस्टसेलर आणि ओप्रा विन्क्रेच्या आवडत्या द बुक ऑफ अवेकनिंग कडून साप्ताहिक ज्ञान\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे छोटेसे पुस्तक, तुम्ही सहजरीत्या कुठेही घेऊन जाऊ शकता. यामध्ये मार्क नेपो यांच्या प्रिय क्लासिकमधील प्रेरणादायी विचार आहेत. प्रस्तुत पुस्तकाच्या साप्ताहिक वाचनात, आपल्या आनंदाला आलिंगन देण्यापासून ते आपल्या दुःखाला तोंड देण्यापर्यंतच्या विविध विषयांचा समावेश आहे. द लिटल बुक ऑफ अवेकनिंग पुस्तक, वाचकांचं हृदय उलगडते आणि जीवनातील आशीर्वादांसाठी त्यांचं मन जागृत करते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमार्क प्रस्तावनेत सांगतात, 'मला आशा आहे की, तुम्हाला इथे काहीतरी शांत करणारं, सुरक्षितता देणारं, आव्हान देणारं, विस्तारित करणारं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःची ओळख करून देणारं असं काहीतरी मिळेल.'\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमार्क नेपो यांनी त्यांच्या #1 न्यू यॉर्क टाइम्स बेस्ट सेलर, द बुक ऑफ अवेकनिंग या पुस्तकाद्वारे जगभरातील वाचकांना आणि साधकांना प्रेरणा दिली आहे. या पुस्तकाच्या दहा लाखांहून अधिक प्रतींची विक्री झाली आहे. कवी, शिक्षक आणि कथाकथनकार म्हणून प्रिय असलेल्या मार्क यांना 'आमच्या काळातील सर्वोत्तम आध्यात्मिक मार्गदर्शकांपैकी एक', 'एक परिपूर्ण कथाकथनकार' आणि 'एक वक्तृत्वपूर्ण आध्यात्मिक गुरू' असं म्हटलं जातं. त्यांचं कार्य व्यापकरीत्या उपलब्ध असून, त्यांची पुस्तकं २०पेक्षा अधिक भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत. बेस्टसेलिंग लेखक म्हणून त्यांनी २५ पुस्तकं प्रकाशित केली आहेत आणि १६ ऑडिओ प्रकल्प रेकॉर्ड केले आहेत. २०१५मध्ये त्यांना एज नेशनतर्फे 'लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड' देण्यात आला. २०१६मध्ये वॉटकिन्सः माइंड बॉडी स्पिरिटने त्यांना, आध्यात्मिकदृष्ट्या प्रभावशाली शंभर जिवंत लोकांपैकी एक म्हणून नावाजले, तसेच OWNच्या सुपरसोल १०० पैकी एक म्हणूनही त्यांची निवड झाली. OWN हा मानवतेला उंचावण्यासाठी त्यांच्या देणग्या आणि आवाजांचा वापर करणाऱ्या प्रेरित नेत्यांचा एक गट आहे.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Mark Nepo \/ Manjul publishing House","offer_id":53639521435947,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-06-03at4.35.27PM.jpg?v=1780484779","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/the-little-book-of-awakening-%e0%a4%a6-%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%9f%e0%a4%b2-%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%95-%e0%a4%91%e0%a4%ab-%e0%a4%85%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}