{"product_id":"steve-jobs-mantra-स्टीव्ह-जॉब्स-मंत्र","title":"Steve Jobs Mantra ( स्टीव्ह जॉब्स मंत्र )","description":"\u003cp\u003e'स्टीव्ह जॉब्स मंत्र' या पुस्तकात जे ईलियट वाचकांना स्टीव्हला जवळून पाहण्याची, बघण्याची एक संधी देतो जी फक्त स्टीव्हच्या अगदी जवळच्या सहकाऱ्यांनाच मिळाली होती. आज स्टीव्ह जो काही आहे तो कसा घडला त्याच्या व्यवस्थापनाच्या शैलीमागचं गूढ जाणून घेण्याची संधी मिळते. त्यानं अशी काही वैशिष्ट्यपूर्ण उपकरणं बनवली की ज्यामुळे तीन उद्योगांना नवा जन्म मिळाला. आणि सर्वसामान्यांच्या आयुष्याला आपण जे काही निर्माण करतो, उपभोग घेतो आणि एकमेकांशी संवाद करतो एक वेगळंच वळण लावलं आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअॅपलमध्ये जे ईलियटनं वरिष्ठ उपाध्यक्ष या नात्यानं स्टीव्हच्या खांद्याला खांदा लावून काम केलं असल्यामुळे स्टीव्हनं जी नवी वैशिष्ट्यपूर्ण आयलीडरशिप नेतृत्त्वपद्धती शोधून काढली, तिच्या बाबतचं त्याचं स्वतःचं मत, दृष्टीकोन काय आहे त्याचीही एक झलक दिली आहे. आयलीडरशिपची चार प्रमुख तत्त्वं आहेत: उत्पादन, गुणवत्ता, संघटना आणि विक्रीतंत्र.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअंतःप्रेरणेला महत्त्व दिल्यामुळे स्टीव्हनं ही नवी विचारप्रणाली उपयोगात आणली. जेबरोबर त्यानं मित्रत्वाच्या नात्यानं जी वैचारिक देवाण-घेवाण केली त्यातूनच जेच्या लक्षात आलं की आयलीडरशिपच्या सर्जनशील आणि तंत्रज्ञानविषयक प्रतिभेचा उपयोग केल्यानं कुठल्याही संघटनेत - ती लहान असो वा मोठी आमूलाग्र बदल घडवता येतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखकाविषयी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअॅपल कॉम्प्युटरमध्ये जे ईलियटनं वरिष्ठ उपाध्यक्ष ह्या पदावर काम केलं - थेट स्टीव्हच्या, संचालक मंडळाच्या अध्यक्षाच्या हाताखाली काम करण्याची संधी ही साधीसुधी बाब नव्हती. मॅकिनटॉश संघटनेतही त्यानं जॉब्सला मॅकिनटॉश कॉम्प्युटरचा अथपासून इतिपर्यंत विकास करण्यात मोलाची मदत केली. वॉलस्ट्रीट जर्नल, न्यूयॉर्क टाईम्स, टाईम मॅगझिन आणि फॉर्च्यूनमध्ये जे ईलियटचे लेख तसंच मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत. जे कॅलिफोर्नियामध्ये राहातो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविल्यम एल. सायमन याने आत्तापर्यंत वीसहून अधिक पुस्तकांसाठी पुरस्कार मिळवले आहेत.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ William L. Simon \/ Jaico Books","offer_id":53768481767723,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-06-16at4.30.57PM.jpg?v=1781608359","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/steve-jobs-mantra-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9-%e0%a4%9c%e0%a5%89%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}