{"product_id":"speeches-that-changed-the-world-जगात-बदल-घडणारी-भाषणे","title":"Speeches That Changed The World ( जगात बदल घडणारी भाषणे )","description":"\u003cp\u003eमहान प्रभूतींच्या भाषणांना बदलत्या कालपटावर एक सखोलता, स्वतंत्रता तसेच मर्मभेदक अर्थपूर्णता प्राप्त होत असते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e२०व्या शतकातील जगात बदल घडवणारी भाषणे, त्याचे हे नेटके संकलन व संपादन आहे. ही भाषणे सत्ताकांक्षा युद्धे, एकसंघता व विभाजन यांचे निदर्शन करतात. यातून थेट व्यक्त होणारा पराकोटीचा द्वेष आणि आशावाद, प्रेम करुणा, वेदना व जीवघेणी दुःखे, राजकारण तसेच मुत्सदेगिरी या सारख्या गोष्टींना आज एक ऐतिहासिकता प्राप्त झालेली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहात्मा गांधी, मार्टिन ल्यूथर किंग ज्यू., लेनिन, स्टॅलिन, अॅडॉल्फ हिटलर, जॉन.एफ. केनडी तसेच इंदिरा गांधी, अरुंधती रॉय अशा एक ना अनेक प्रभावी व प्रगल्भवक्त्याच्या भाषणातून त्यांचे द्रष्टेपण, त्यांची तळमळ, त्यातील टीका-टिप्पणी व तत्त्वे ही अभ्यासण्यासारखी आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएकूणच, ही भाषणे आधुनिक जगाचा आशावाद-खेद वा खंत व्यक्त करतात. त्यातील तीक्ष्णता व प्रभावी परिणामकारकता तुम्हाला भावल्याखेरीज राहणार नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजवळ जवळ ४० पुस्तकांचा कर्ता असणारा ऑस्ट्रेलियन ललितेतर लेखक अॅलन जे. व्हिटीकर यांनी प्रस्तुत पुस्तकाचे संपादन केले आहे. मुळात प्राध्यापकी पेशेतून आलेला हा मुक्त चिंतक-लेखक सध्या अनेक प्रकाशकांचा सन्मानीय सल्लागार म्हणून काम करतो आहे.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"Default Title","offer_id":53920576700715,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-06-25at15.09.31.jpg?v=1782380414","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/speeches-that-changed-the-world-%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a4%b2-%e0%a4%98%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a5%87","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}