{"product_id":"shutter-speed-शटरस्पीड","title":"Shutter Speed ( शटरस्पीड )","description":"\u003cp\u003eहिंदी चित्रपट हा आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहिंदी चित्रपट आपली फक्त करमणूकच करतो असे नव्हे, तर आपण कसली केशभूषा करतो, कसली वेशभूषा करतो, आपण कसे बोलतो, काय बोलतो, कसा विचार करतो या सगळ्यांवर कळत-नकळत आपण पाहिलेल्या चित्रपटांचा ठसा उमटलेला असतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचित्रपटांचा आशय, दर्जा हा एक भाग झाला, चित्रपटांनी मिळवलेले आर्थिक यश हा दुसरा भाग झाला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे दोन्ही भाग Mutually Exclusive -\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'परस्पर अनन्य' नसले तरी दर्जेदार आणि तिकिटांच्या बारीवर यशस्वी अशा चित्रपटांची संख्या तुलनेने कमी असते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकाही सामान्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई करतात, तर काही उत्तम दर्जाचे चित्रपट व्यावसायिक यश मिळवू शकत नाहीत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'शटरस्पीड' या पुस्तकात काही परिचितं तर काही अनवट हिंदी चित्रपटांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया चित्रपटांच्या सौंदर्यस्थळांची ही मीमांसा वाचून वाचकाला काही ठिकाणी पुनः प्रत्ययाचा आनंद मिळेल, तर काही अपरिचित जागा कळतील अशी आशा आहे. या पुस्तकातले न पाहिलेले चित्रपट मुद्दाम पहावे अशी वाचकाला प्रेरणा होईल असेही वाटते.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Sanjiv Kulkarni \/ New Era Publishing House","offer_id":53635306553643,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/shatarspeech.png?v=1780400034","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/shutter-speed-%e0%a4%b6%e0%a4%9f%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%a1","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}