{"product_id":"sanvidhan-bhan-संविधान-भान","title":"Sanvidhan Bhan ( संविधान भान )","description":"\u003cp\u003eसंविधानकर्त्यांचे शपथपत्र होते मानवी मूल्यांसाठी. नेहरुंनी सांगितलेल्या नियतीच्या काव्यात्म करारासाठी. गांधींच्या 'वैष्णव जन तो तेणे कहिए' म्हणणाऱ्या भारतासाठी. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या समताधिष्ठित समाजासाठी. ताठ मानेने जगता येईल, अशा टागोरांच्या भीतिशून्य समाजासाठी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसाने गुरुजींच्या प्रेमाचा धर्म सांगणाऱ्या बलशाली भारतासाठी. दाक्षायणी वेलायुधनच्या गावकुसाबाहेरच्या आभाळासाठी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजयपालसिंग मुंडांच्या आदिवासी पाड्यातल्या 'उलगुलान' साठी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमौलाना आझादांच्या 'गंगा जमनी तहजीब' सांगत शिक्षणाची कास धरणाऱ्या इंद्रधनुषी भारतासाठी. सावित्रीबाईच्या शाळेचा रस्ता अधिक प्रशस्त होण्यासाठी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबुद्धाच्या पिंपळासाठी. माणसातला ईश्वर जागवणाऱ्या गुरू नानकांसाठी. खुल्या दिलाने माफ करणाऱ्या येशूसाठी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबाजाराच्या मधोमध उभं राहून सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करणाऱ्या कबीरासाठी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंत रवीदासांच्या बेगमपुऱ्यासाठी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुकोबाची गाथा तारणाऱ्या इंद्रायणीसाठी आणि चेतना चिंतामणीच्या गावाचा रस्ता सांगणाऱ्या ज्ञानोबासाठी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया शपथपत्राला जागण्यासाठीचा हा जेंटल रिमांइडर !\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Shriranjan Avate \/ Rohan Prakashan","offer_id":53634844328235,"sku":null,"price":770.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/savidhan.png?v=1780391433","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/sanvidhan-bhan-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%a8","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}