{"product_id":"ranzunjar-रनझुंजार","title":"Ranzunjar ( रनझुंजार )","description":"\u003cp\u003eया पुस्तकाच्या पानोपानी तुम्हाला रांगड्या सह्याद्रीचा साक्षात्कार होईल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रत्येक ओळीत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या तेजाळ खुणा दिसतील.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमजकुरातून देखण्या नागाची सळसळ जाणवेल, बहिरी ससाण्याच्या भेदक नजरेतून अफाट शौर्याचा अनुभव येईल, शब्दाशब्दांतून स्वराज्यप्रेमाचा रसरशीत स्फुलिंग दिसेल...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकाळ्या कातळावरचा अज्ञात रक्ताचा सपकारा मनाला अस्वस्थ करेल, भाबड्या मावळ्यांचं निस्सीम शिवप्रेम अंतःकरणाला पाझर फोडेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही आहे झुंजार मावळ्यांच्या पराक्रमांची, जिद्दीची, अखंड जयमाला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे त्या तलवारींचे स्मरण आहे, ज्यांच्या धारेने बलाढ्य बादशाही गर्वाचा चुराडा केला. ही त्या शेता-बांधावरच्या असंख्य मावळ्यांच्या बलिदानाची अमरकहाणी आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्यांनी आपल्या निष्ठावंत रक्ताने स्वराज्याचा जाज्वल्य इतिहास रचला, त्या सार्वभौम स्वराज्याच्या रोमहर्षक, प्रेरणादायी,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशौर्यकथांची ही यशोगाथा...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रताप गंगावणे हे मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रांतील एक बहुआयामी आणि लोकप्रिय लेखक म्हणून ओळखले जातात. कथा, पटकथा आणि संवादलेखन या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी अनमोल योगदान दिले आहे. त्यांच्या संशोधनात्मक लिखाणातून सामाजिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक विषयांना प्रभावीपणे मांडण्याची ताकद देसून येते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआजवरच्या उत्कृष्ट लेखनकौशल्यासाठी त्यांना राज्य आणि राष्ट्रीय तरावर अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Pratap Gangavane \/ Saket Prakashan","offer_id":53617920344363,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-05-26at4.46.37PM.jpg?v=1779794257","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/ranzunjar-%e0%a4%b0%e0%a4%a8%e0%a4%9d%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b0","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}