{"product_id":"rahashyamay-patre-रहस्यमय-पत्रे","title":"Rahashyamay Patre रहस्यमय पत्रे )","description":"\u003cp\u003eप्रत्यक्ष सौंदर्यपूर्ण जक्षण्याशी निगडित आशय व जीवनदर्शन सहजपणे अभिव्यक्त करणाऱ्या जगप्रसिद्ध लेखकाची एक सन्माननीय भेट.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजोनथान लान्ड्रे हा गृहस्थ समस्याग्रस्त आहे तीव्र हृदयविकारानंतर परागंदा झालेला, हायकोर्टाचा एक नावाजलेला उच्चभ्रू वकील, आपले वैभवशाली जीवन मागे टाकून, हिमालयात एकटाच निघून जातो. जुलियनने शोधून काढलेली, असामान्य जीवनरहस्ये प्रकट करणारी पत्रे, या पृथ्वीतलावरच्या निरनिराळ्या देशातून आणण्यासाठी ज्युलियन जोनाथनला विलक्षण आग्रह करतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणाऱ्या या प्रदीर्घ प्रवासात, ब्युनोस आयर्सचा टैंगो हॉल, मनाला हादरवून सोडणारा पॅरिसचा कॅटॅकाँब, शांघायतील चमकदार टॉवर्स आणि भारतातील अत्यंत सुंदर, कलात्मक व सर्वोत्कृष्ठ ताजमहाल यांच्या भेटी आणि त्या निमित्त भेटलेल्या नानाविध अनुभवसंपन्न व्यक्ती, या सर्वातून जोनाथनला जीवनाचे एक अनोखे दर्शन घडते. इतकेच नव्हे तर हा प्रवास जोनाथनला एके क्षणी महानतेकडे शहाणपणाकडे घेऊन जातो. एकूणच द मंक हू सोल्ड हिज फेरारी मधील ही महान जीवनदायी मर्म प्रकटणारी संरक्षक पत्रे, तुमच्यातील तेजप्रतिभा प्रकट तर करतीलच पण तुम्ही जर या प्रकाशात जगलात तर निश्चितपणे तुम्ही पाहिलेली मोठी स्वप्ने प्रत्यक्ष तुमच्या जीवनात साकारतील.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"रॉबिन शर्मा यांच्या अनुयायांची संख्या दलाई लामा यांच्या अनुयायांशी स्पर्धा करताना दिसते.\" -द टाईम्स ऑफ इंडिया\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरॉबिन शर्मा, 'द् मंक हू सोल्ड हिज फेरारी' या पुस्तकाने प्रकाशझोतात आलेल्या आणि इतर १५ सर्वाधिक खपाची पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांच्या पुस्तकांचे ७५ भाषेमध्ये अनुवाद झालेले असून त्यांच्या १५ मिलियन अधिक प्रतींची विक्री झालेली आहे. 'शर्मा लिडरशिप इंटरनॅशनल इन्क.' या प्रशिक्षण संस्थेचे ते संस्थापक आहेत व त्याद्वारे 'पदाशिवाय नेतृत्व कसे करावे' या विषयावर ते कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतात. अनेक फॉर्च्यून ५०० कंपन्यांचे मुख्याधिकारी, रॉक संगीतातील सितारे, आघाडीचे उद्योगपती आणि राजघराण्यातील व्यक्ती त्यांच्या कार्याचे चाहते आहेत. त्यांच्या ग्राहकांच्या मांदियाळीत मायक्रोसॉफ्ट, स्टारबक्स, कोका कोला आणि अगदी नासा सारख्या नामवंत कंपन्यांचा समावेश होतो.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"Default Title","offer_id":53767068909867,"sku":null,"price":199.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-06-16at1.15.16PM.jpg?v=1781596501","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/rahashyamay-patre-%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}