{"product_id":"purnatvache-pravasi-पूर्णत्वाचे-प्रवासी","title":"Purnatvache Pravasi ( पूर्णत्वाचे प्रवासी )","description":"\u003cp\u003e'पूर्णत्वाचे प्रवासी' चं लेखन माझे आजोबा डॉ. शरदचंद्र शंकर कुलकर्णी जेव्हा करत होते, तेव्हा मी आणि आनंद शब्दशः पाळण्यात होतो, आणि मी तर खूप दूर अमेरिकेत शिकागोमध्ये होतो. पण इतक्या दुरून आजोबा ज्या आत्मीयतेनं आमच्याकडे पाहत होते, त्याचं महत्त्व आणि त्यातलं ममत्व आमच्या वैयक्तिक जीवनात आजही कायम आहे हे सतत जाणवत राहतं. आपल्यापैकी प्रत्येक जणच आपापल्या पूर्णत्वाच्या दिशेनं कळत-नकळत प्रवास करत असतो तेव्हा आजोबांनी सांगितलेल्या गणपती, श्रीकृष्ण आणि श्रीराम यांचेविषयीच्या उद्बोधक आणि तरीही मनोरंजक कथा आम्हाला अनुभवाव्या लागणाऱ्या संघर्षात, सुख-दुःखात आजही पथदर्शक वाटतात. आजोबांनी लिहिलेले विचार वाचताना माझे जीवन आणि आजोबांचे जीवन असे वेगळे काही उरतच नाही, आम्ही दोघेही मिळून एका वैश्विक परिपूर्ण सत्याचाच भाग बनतो. त्यातले जीवनसंगीत आम्हाला निश्चितच जीवनप्रेरणा देत असते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविवेकानंद केंद्राने श्याम आणि आनंदच्या या भावनाच प्रातिनिधिक मानून कुटुंबा-कुटुंबात असे जीवनसंगीत प्रवाहित होत रहावे यासाठी अमृत परिवार ही कल्पना मांडली. लेखक आणि त्याची दोन्ही नातवंडे यांच्यात या लेखनातून उत्पन्न होणारे जीवनबंध समाजरूप व्हावेत यासाठी परिसरातील पाच कुटुंबांनी भाषा-भोजन-भ्रमण आदीच्या माध्यमातून घरात स्नेह, संरक्षण, स्वातंत्र्य, सन्मान, सेवा हे भाव प्रवाहित राहतील, मुलांशी संवाद होईल, ते भवितव्याबाबत आश्वस्त होतील आणि संस्कृती, श्रद्धेशी जोडलेले राहतील यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले. 'पूर्णत्वाचे प्रवासी' हे पुस्तक त्या दृष्टीने महत्त्वाचे ठरावे.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Dr. Sharad Kulkarni \/ Vivekanand Kendra Kanyakumari","offer_id":53623484875051,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-05-28at12.45.58PM.jpg?v=1779952616","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/purnatvache-pravasi-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%80","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}