{"product_id":"punyashlok-ahilyadevi-holkar-पुण्यश्लोक-अहिल्यादेवी-होळकर","title":"Punyashlok Ahilyadevi Holkar ( पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर )","description":"\u003cp\u003eआपल्या कार्यकर्तृत्वामुळे 'पुण्यश्लोक' ठरलेल्या भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या प्रवर्तक म्हणजे अहिल्यादेवी होळकर ! त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाच्या औचित्याने साकारलेला प्रस्तुत ग्रंथ म्हणजे अहिल्यादेवींच्या समग्र कार्यकर्तृत्वराचा, जीवनचरित्राचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विभिन्न पैलूंचा वेध घेणारा दस्तऐवज आहे. अहिल्यादेवींच्या जीवनचरित्रातील अलक्षित आयामांवर प्रकाश टाकणारे नवीन आणि जुने दुर्मीळ लेख या ग्रंथात संपादित करण्यात आले आहेत. शिवाय यात अनेक अप्रकाशित शिलालेखांचा आणि ऐतिहासिक पत्रांचा समावेश करण्यात आला आहे. आपल्या हयातीतच प्रजेच्या मनात देवत्वाला पोहोचलेल्या अहिल्यादेवी कालांतराने 'अहिल्योत्सवा'च्या रूपाने मध्य भारतातील स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देणारी शक्ती म्हणून समोर आल्या. या उत्सवाची नेमकी सुरुवात कशी झाली, त्याचे स्वरूप किती व्यापक होते आणि त्याचा उपयोग स्वातंत्र्य चळवळीला कसा झाला यांविषयीही ग्रंथात काही लेख आहेत. अहिल्यादेवींच्या समकालीन पंडित, कवी आणि शाहीर यांचे निवडक काव्य-वाङ्मय हेही या ग्रंथाचे ठळक वैशिष्ट्य आहे. याशिवाय विदेशी लेखकांचे काही संक्षिप्त साहित्यही या ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहे.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Pranav Patil \/ Krishna Publication","offer_id":53650002346283,"sku":null,"price":999.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/holkar.png?v=1780743695","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/punyashlok-ahilyadevi-holkar-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95-%e0%a4%85%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}