{"product_id":"prisoner-of-yakutsk-प्रिझनर-ऑफ-याकुटस्क","title":"Prisoner of Yakutsk ( प्रिझनर ऑफ याकुटस्क )","description":"\u003cp\u003eनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत नक्की काय घडलं?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१९४५मध्ये 'आयएनए'चे नेते नेताजी सुभाषचंद्र बोस सिंगापूरहून विमानाने प्रवासाला निघतात आणि फोरमोंसा इथे त्यांचं विमान कोसळतं किंवा तसं वाटतं आणि तैवान इथं त्यांचा मृत्यू होतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eश्री. व सौ. सिंग हे सैन्यदलातील सुविख्यात दाम्पत्य. दोघेही इंडियन नॅशनल आर्मीत दीर्घकाळ सेवेत होते. १९४७मध्ये ते दिल्लीत अखेरचे दृष्टीस पडले होते. त्यानंतर पुन्हा ते कधीच दिसले नाहीत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१९४९मध्ये, भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल ज्या विमानातून प्रवास करत होते, ते विमान तब्बल सात तासांसाठी गूढरित्या गायब होतं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविकिलीक्सच्या अपयशानंतर त्याच नाठाळ एक्स ग्रुपमधील एक महिला हॅकर परागंदा आहे. प्रत्येक इंटरपोल व केजीबी तिच्या शोधात आहे अशी माहिती आहे. ही घटना आहे २०१२मधील !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e२०१५मध्ये एका फॉरच्युन-५०० कंपनीचा सीईओ अचानक राजीनामा देतो आणि लोकांसाठी गायब होतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपरस्परांशी या घटनांचा संबंध नाही असं वाटेल तुम्हाला; पण सतत कोणी गायब होण्याच्या या घटनांची मालिका एकत्र केल्यास एका घटनेतून दुसऱ्या घटनेची\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eउकल होत जाते. या खिळवून ठेवणाऱ्या कथानकातून बेस्टसेलर लेखक श्रेयस भावे वाचकांना एका गूढ प्रवासाला घेऊन जातात. सबंध भारत देशाला आजवर ज्या प्रश्नाचं उत्तर गवसलं नाही, ते शोधण्याचा हा चित्तथरारक आणि खिळवून ठेवणारा प्रवास !\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Shreyas Bhave \/ Krishna Publication","offer_id":53689090605355,"sku":null,"price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/bose.png?v=1781080943","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/prisoner-of-yakutsk-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%9d%e0%a4%a8%e0%a4%b0-%e0%a4%91%e0%a4%ab-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%9f%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}