{"product_id":"prem-diwani-प्रेम-दिवाणी","title":"Prem Diwani ( प्रेम दिवाणी )","description":"\u003cp\u003eअॅड. विलास नाईक यांची साहित्यसंपदा आणि त्यांना मिळालेले अनेक प्रतिष्ठित पुरस्कार पाहता त्यांचे कार्यकर्तृत्व खरोखरच कौतुकास्पद आहे. कथा, कादंबरी, स्फुट, अनुभवकथन, इतिहासकथन, वनस्पती शास्त्र आणि मुख्यतः खून खटले ही त्यांची वैविध्यपूर्ण पुसतके अत्यंत वाचनीय आहेत. प्रस्तुत 'प्रेम दिवाणी' कादंबरी सुध्दा कोर्ट-कचेरी, वाद प्रतिवाद आणि त्यातून रहस्य उलगडण्याचे कसब यामुळे निश्चितच वाचकांस गुंतवून ठेवते. एक बारबाला आणि तिची होणारी भावनिक घुसमट अतिशय हृदयस्पर्शी पद्धतीने त्यांनी मांडली आहे. खून आणि खटला हे विषय अॅड. विलास नाईकांच्या दिनक्रमात रोज समोर येणारे असले, तरी त्यांच्या लिखाणात कुठेही रूक्षपणा जाणवत नाही. पोलीस तपास हा विषयसुद्धा ते रंजक करतात आणि कुठेही पाल्हाळ न लावता संपूर्ण कथानक रसाळ करतात. बारबालाच्या सुख-दुःखांना, भावभावनांना, इच्छा-आकांक्षांना सखोलपणे चित्रित करणारी ही कादंबरी एका वेगळ्याच पातळीवर वाचकास घेऊन जाते आणि विचारप्रवृत्तही करते. एकंदर अशी पुस्तके केवळ ज्ञानच देतात असे नाही. तर प्रबोधनही करतात !\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Vilas Nike \/ Savedhna Publication","offer_id":54804169654571,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-07-31at11.54.51AM.jpg?v=1785479125","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/prem-diwani-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%ae-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}