{"product_id":"pra-प्र-prashant-bagad","title":"Pra ( प्र ) Prashant Bagad","description":"\u003cp\u003eवेशीवरच्या दगडी दरवाजात जाऊन बसणारा खिन्न तरुण, बॅट विकत घ्यायचं जगद्व्याळ स्वप्न बघणारा मुलगा, भाड्याने घ्यायची जागा निरखणारी नवोदिता, कबुतरांच्या बसण्याउडण्याच्या संथ खयालात तरंगणारा कथक, एक शिक्का माथी बसल्यावर जगण्यावागण्याला लागणारं मुकं वळण, समोर घडणाऱ्या संबंधाच्या विहिरीत डोकावणारी गहिरी अभिलाषा, आपला आसमंत थिटा नाही ना या आशंकेचं काहूर सांभाळणारा अरूपवान कुणी असं काहीबाही या कथांच्या ठायी आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएखाद्या स्वल्पकथेत घटिताच्या व शैलीच्या शक्यतांची द्विवेणी आहे. एखाद्या स्वगतकथेत गावी परतलेल्या, जणू भूतकाळात परतलेल्या, अंधारआकृतीचं चाचपडणं आहे. एखाद्या अन्वेषककथेत मरणाच्या भाषेत जगण्याचा अनुवाद करणारी आई आहे. एखाद्या दृष्टांतकथेत स्वप्नहीन सैरभैरतेचं निबंधन आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभाषेची विपुलता व विरळता, कथनाची बहुस्तरीयता व सरलता, आकलन व अनाकलन यांची द्वंद्वात्मकता, व्यक्तींचा-कथकांचा-कृतिउक्तींचा बहुसाळपणा निरखत, पेन्सिलीने खुणा करत, अधूनमधून थांबत वाचाव्यात अशा या कथा.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Prashant Bagad \/ Woldan Publication","offer_id":53916079980843,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-06-24at15.07.40.jpg?v=1782293950","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/pra-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0-prashant-bagad","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}