{"product_id":"mithakanche-jag-मिथकांचे-जग","title":"Mithakanche Jag ( मिथकांचे जग )","description":"\u003cp\u003eमाणूस हा गोष्टीवेल्हाळ प्राणी आहे, त्याला गोष्टीत रमायला आवडतं. किंबहुना अशा गोष्टी रचणं हेच त्याचं होमोसेपियन सेपियन म्हणजेच अतिक्षार मानव असल्याचं लक्षण आहे. आज अनेक प्राचीन गुहांमध्ये शिकारी अवस्थेतील मानवानं काढलेली चित्रं आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्यात देवकल्पना साकारलेली दिसत नाही. त्यात निसर्गातील अनेक प्रतीकं दिसतात. कदाचित तेच त्याचे देवता किंवा भीतीची स्थानं असतील. मात्र जेव्हा मानव शेती करू लागला, त्यावेळेस त्याला आपल्यासारख्याच, मानवी शरीर असलेल्या, देवांची गरज भासली असावी. या अवस्थेत देवी देवता जन्माला आल्या आणि त्याबरोबर त्यांच्या मिथककथा देखील मानवांच्या कल्पनाशक्तीनं भरारी घेतली आणि पूर्ण जगामध्ये देवतांचे एकापेक्षा एक भारी अवतार जन्माला आले. त्यांच्या व्हर्जन्स अपडेट होत राहिल्या. व्यापार जसा वाढत गेला तसंतशा या मिथककथा देखील जगभर पसरत गेल्या. धारणा, भीती आणि भक्तीची प्रतिकं, भीती आणि भक्ती व्यक्त करायची साधनं या सर्वांचा प्रसार होत गेला. आफ्रिका, आशिया आणि युरोप हे खंड प्राचीन सिल्करूटच्या मार्गाने जोडले होते. इथल्या संस्कृतीमध्ये सांस्कृतिक देवाण-घेवाण झाली, त्यासोबत एकमेकांच्या धर्माचा, देवांचा आणि देवांच्या मिथककथांचा प्रभाव एकमेकांवर पडला. हे जग मिथकांच्या धाग्यानं जोडलं आहे. हा धागा उलगडत गेला तर आपल्याला मानवाचं झालेलं स्थलांतर देखील समजून घेता येतं.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ dr nitin hande \/ new era publishing house","offer_id":53626911555883,"sku":null,"price":380.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-05-29at6.31.21PM.jpg?v=1780059724","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/mithakanche-jag-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a5%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a4%97","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}