{"product_id":"maratha-armar-मराठा-आरमार","title":"Maratha Armar ( मराठा आरमार )","description":"\u003cp\u003eभारतीय इतिहासाशी निगडित अनेक पैलूंपैकी भारताची उज्वल नाविक परंपरा हा एक महत्त्वाचा पैलू असला तरीही स्थानिक भाषांमध्ये याविषयी मर्यादित स्वरूपात लेखन आपल्यासमोर येते. या नाविक परंपरेविषयी अनेक संदर्भ आढळत असले तरीही कुठेही 'लढाऊ नौदल' असा उल्लेख क्वचितच दिसतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयुरोपीय व्यापारी भारतीय किनाऱ्यावर आले आणि नंतर भारताच्या इतिहासातील नाविक पर्वाची सुरुवात झाली. आधी व्यापार, नंतर स्थानिक राजकारणात हस्तक्षेप करुन आपला जम बसविण्यास त्यांनी सुरुवात केली. हे साध्य करण्यासाठी त्यांच्याकडे होते ते प्रबळ आरमार जे त्या काळी कुठल्याही सत्ताधिकाऱ्याकडे नव्हते. परंतु या आरमारी शक्तींना आपल्या आवाक्यात ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेल्या आणि नंतर आंग्रे घराण्याने विकसित केलेल्या स्थानिक लहान, पण सक्षम अशा मराठा आरमाराने केले. मराठा आरमाराचा अंत १७५६ मध्ये झाला आणि हिंदुस्थान पुढील २०० वर्षे पारतंत्र्याच्या अंधारात बुडून गेला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमराठा आरमारावरील या पुस्तकात कुठलीही कथा सांगितली नसून, छत्रपतींनी स्थापन केलेल्या मराठा आरमारापासून, आंग्रे घराण्याचे आरमारातील भरीव योगदान आणि पेशवेकालीन आरमार याशिवाय आरमाराचे संघटन, जहाजे, तोफा, नाविक युध्दतंत्र याविषयी इतिहासाशी प्रामाणिक राहून विस्तृत माहिती दिली आहे व शेवटी त्याची मीमांसा केली आहे.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% \/ Sachin Pandase \/ Merven Technologies","offer_id":53908456767787,"sku":null,"price":500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/maratha.png?v=1782136337","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/maratha-armar-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}