{"product_id":"life-is-what-you-make-it-तुमचे-आयुष्य-तुमच्या-हाती","title":"Life Is What You Make It ( तुमचे आयुष्य तुमच्या हाती )","description":"\u003cp\u003eतुम्ही स्वीकारलेला रस्ताच नियतीने बदलला तर? तिने तुम्हाला नको असलेल्या ठिकाणी ढकलले तर? तुम्ही लढाल, पळून जाल की नशीब म्हणून सगळ्या गोष्टी स्वीकाराल?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुमचे आयुष्य तुमच्या हाती म्हणजे ऐंशीच्या दशकातल्या अंकिताने तिच्या आयुष्यात भारतातल्या दोन शहरांमध्ये व्यतीत केलेल्या काही वर्षांची कहाणी आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजवळपास सगळे जग अंकिता शर्माच्या पायाशी आहे. ती तरुण, हुशार, सुंदर आणि चतुर असून तिचे खूप मित्रमैत्रिणी आहेत, बऱ्याच मुलांना ती आवडते. तिला व्यवस्थापनाच्या प्रख्यात संस्थेत एमबीएसाठी प्रवेश मिळतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमात्र सहा महिन्यांनी ती एका मानसिक रुग्णालयात दाखल झालेली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतिच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी आयुष्याने निर्दयीपणे तिच्याकडून काढून घेतल्या आहेत आणि आता त्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी तिला लढायचे आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवाढत्या वयातल्या प्रसंगांची, आशेवर ठेवलेल्या विश्वासाची आणि दृढनिश्चय तसेच प्रबळ इच्छाशक्ती असेल तर आयुष्याने तुमच्या रस्त्यात आणलेले अडथळेही आपण पार करू शकतो याची ही एक प्रेरणादायी आणि खूप गंभीर गोष्ट आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही एक अशी गोष्ट आहे जिच्या मुळाशी प्रेमकथा असली तरीही ती आपल्याला आपल्या विश्वासाची यंत्रणा तसेच शहाणपणाच्या संकल्पनेविषयी प्रश्न उपस्थित करायला भाग पाडते आणि 'खरेच आपण जसे घडवतो आयुष्य तसेच घडत जाते' यावर आपल्याला विश्वास ठेवायला भाग पाडते\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Preeti Shenoy \/ Jaico Books","offer_id":53911040819499,"sku":null,"price":199.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-06-23at17.00.00.jpg?v=1782214239","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/life-is-what-you-make-it-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}