{"product_id":"laxmi-panda-लक्ष्मी-पांडा","title":"Laxmi Panda ( लक्ष्मी पांडा )","description":"\u003cp\u003eदुसऱ्या महायुद्धात ब्रह्मदेश होरपळून निघत असताना चौदा वर्षांची लक्ष्मी तिच्या आई-वडिलांना गमावते त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आणि आपल्या मातृभूमीला भारताला स्वतंत्र करण्यासाठी, अथक प्रयत्नांनंतर ती आझाद हिंद फौजेच्या 'झाशीची राणी' पलटणीत भरती होते वयाने सगळ्यात लहान सैनिक म्हणून ।\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही धाडसी मुलगी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या मार्गदर्शनाखाली कुशल हेर होण्यापर्यंत मजल मारते लहानखुऱ्या चणीची लक्ष्मी आपल्या हुशारीच्या जोरावर, अनेक अडथळे पार करत ब्रिटिशांच्या छावणीपर्यंत पोचते महत्त्वाची माहिती गोळा करण्याच्या मोहिमेवर ।\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया मोहिमेत ती कधी मोठ्या संकटांतून वाचते, तर कधी तिला अत्यंत भीतिदायक प्रसंगांना सामोरं जावं लागतं पण ती देशासाठी लढत राहते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया प्रवासात तिला स्वतःच्या खंबीरपणाची, चिवटपणाची आणि धाडसाची नव्यानेच ओळख होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकाळाच्या पडद्याआड गेलेल्या या वयाने सर्वांत लहान हेराची, तिच्या धाडसाची, तिच्या त्यागाची, तिच्या संघर्षाची..\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलक्ष्मी पांडा हिची प्रेरक कहाणी...\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Rama Sakhdeo \/ Rohan Prakashan","offer_id":53631828689195,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-06-01at5.06.20PM.jpg?v=1780313823","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/laxmi-panda-%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%be","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}