{"product_id":"hormuzche-mahayuddha-होम्रुझचे-महायुद्ध-जग-बदलणारा-इरान","title":"Hormuzche Mahayuddha ( होम्रुझचे महायुद्ध जग बदलणारा इरान )","description":"\u003cp\u003eहोर्मुझमधील संघर्ष अजूनही संपलेला नाही. जग या इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे भयचकित झाले आहे. हे युद्ध केवळ शस्त्रांनी लढले जात नाहीये. मुळात या तीन राष्ट्रांच्या नेत्यांची इच्छाशक्ती, अहंकार आणि राष्ट्रीय स्वाभिमान या तीन गोष्टींमुळे हा संघर्ष पेटला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया युद्धातील आजपर्यंतच्या घडामोडींचा वेध विजय लोणकर यांनी अत्यंत तटस्थपणे घेतला आहे. अत्यंत गुंतागुंतीचा असणारा हा विषय त्यांनी साधेपणाने, तरीही तितक्याच प्रभावीपणाने मांडला आहे. त्यांचे युद्धसंदर्भातील अभ्यासपूर्ण विश्लेषण आपल्याला विचार करायला भाग पाडते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eराजनैतिक, आर्थिक, सायबर आणि माहिती युद्ध या सर्व आयामांचा समावेश करून लिहिलेले हे पुस्तक मार्गदर्शक दस्तावेज ठरले आहे. भविष्यातील युद्धे केवळ तोफा आणि बंदुकींनी नव्हे, तर माहिती, ऊर्जा, पाणी व तंत्रज्ञानावरील नियंत्रणाने ठरणार आहे. म्हणूनच राष्ट्रीय सुरक्षा, सैन्य, आंतरराष्ट्रीय संबंध आणि धोरण या विषयांमध्ये रुची घेऊन केवळ प्रत्येक विद्यार्थ्यानेच नव्हे, प्रत्येक नागरिकाने ही युद्धजन्य परिस्थिती सखोलतेने समजून घेतली पाहिजे. केवळ माहिती देणारे नव्हे, तर दृष्टी देणारे हे पुस्तक अत्यंत मोलाचे आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eओमान आणि इराण यांच्यामध्ये अरबी समुद्रात ३३ किलोमीटर रुंद असलेली ही होर्मुझची सामुद्रधुनी अखिल विश्वासाठी किती महत्त्वाची आहे; जगाची अर्थव्यवस्था या जलमार्गावर कशी अवलंबून आहे, हे समजून देणारे हे पुस्तक लेखकाने अनेक संदर्भग्रंथांचा उपयोग करून आपल्यासमोर ठेवले आहे.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Vijay Lonkar \/ Vishwakarma Publication","offer_id":53762537816363,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/yu.png?v=1781512211","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/hormuzche-mahayuddha-%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%9d%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7-%e0%a4%9c%e0%a4%97-%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a4%b2%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a8","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}