{"product_id":"happiness-here-and-everywhere-सुख-आणि-समाधान-इथे-आणि-सर्वत्र","title":"Happiness Here And Everywhere ( सुख आणि समाधान इथे आणि सर्वत्र )","description":"\u003cp\u003eसुख आणि समाधान इथे आणि सर्वत्र\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइथे आणि सर्वत्र सुख आणि समाधान, कसे मिळवायचे ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपला जन्म हा सुखानंदासाठीच झालेला आहे. पाळण्यात आनंदाने पहुडलेले मुल तुम्ही अनेकदा पाहिले असेल. आनंदाने जगण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. सहज-स्वाभाविकपणे आपल्याला आनंदी होता आले पाहिजे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअवतीभोवती पाहिले तर अनेक दुःखी उदास चेहरे तुमच्या दृष्टीपथात येतील. मोठे होताना, अनेकांच्या चेहऱ्यावरचे हास्य मावळत का जाते, याचा आपण एकदा शोध घ्यायला हवा !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसुख-समाधानात राहणे, हा जीवाचा स्थायी भाव आहे. पण असे असूनसुद्धा नैराश्य, उदासीनता, ताण-तणाव, नकारात्मक विचार, भीतीसह असुरक्षिततेने ग्रासलेले आपले मन, हे अधिकाधिक शोकमग्न होताना दिसते. खरे तर या साऱ्या प्रतिक्रिया आहेत. आपल्याला जीवनाला सर्वोच्च प्रतिसाद देता आला पाहिजे. एकूणच, आनंदमयतेने प्रसन्नतेने जगणे हेच खरे जगणे आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वतःला जास्तीत जास्त जाणून घ्या. ही अंतर्यात्रा तुम्हाला निश्चितच सुख-समृद्धीकडे नेईल. स्वतः बद्दलचे अज्ञान हे नेहमीच आपल्याला दुःखाकडे नेत असते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलक्षात ठेवा, आपल्याला संपूर्ण मुक्ततेत जगायचे आहे. तेही, इथे आणि सर्वत्र ! जिथे मुक्तता असते, तिथे प्रेमही असते आणि प्रसन्नताही !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमग, सुख-समाधानात, आनंदात राहण्यासाठी तुम्ही तयार आहात ना?\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Just Singh \/ Viva Books","offer_id":53768065548587,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-06-16at2.33.54PM.jpg?v=1781600668","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/happiness-here-and-everywhere-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%96-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%87%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}