{"product_id":"eka-ias-adhikaryachi-sangharshkatha-एका-ias-अधिकाऱ्याची-संघर्षकथा","title":"Eka IAS Adhikaryachi Sangharshkatha (एका IAS अधिकाऱ्याची संघर्षकथा )","description":"\u003cp\u003eअशोक खेमका यांची कारकीर्द म्हणजे आपल्या सदसद्विवेकबुद्धीला पटणाऱ्या निर्णयाच्या बाजूनं ठामपणे उभ्या राहणाऱ्या अधिकाऱ्याच्या बाबतीत काय घडतं याचं उदाहरण आहे. खेमकांनी त्यांच्या विश्वासांना, मूल्यांना सोडून न देता जीवनात त्यांच्या नीतिमत्तेचं पालन केलं. त्याकरिता त्यांनी मोठी किंमत चुकती केली आणि अनेक वेळा झालेल्या बदल्याही झेलल्या; पण आपल्या तत्त्वांशी ते प्रामाणिक राहिले याचा मला आनंद वाटतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयशवंत सिन्हा, भारताचे माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि परराष्ट्रमंत्री\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'कर्तव्यपालन करताना मूल्यांशी, नैतिक तत्त्वांशी आणि प्रामाणिकपणाशी कधीही तडजोड न करणारे अशोक खेमका यांच्यासारखे लोक अत्यल्पच असतात. फक्त असेच लोक स्वातंत्र्यापूर्वी भारतानं जोपासलेल्या मूल्यांच्या बाजूनं ठामपणे उभे राहतात. आपल्या तत्त्वांचं पक्कं आचरण करणारा आणि कधीही दबावाला बळी न पडलेला सच्चा लोकसेवक म्हणून आगामी पिढ्यांच्या आठवणीत\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eखेमकांना निश्चितपणे स्थान मिळेल, याविषयी माझ्या मनात कसलीच शंका नाही.'\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eन्यायमूर्ती जी. एस. सिंघवी, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'अशोक यांची कथा वाचलीच पाहिजे, अशी आहे. सध्या नोकरीत असलेल्या नोकरशाहनी आणि सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांनी तर ती वाचली पाहिजेच; पण त्यांच्याशिवाय अभिमान वाटण्याजोग्या देशाची उभारणी करण्याची जबाबदारी आपलीही आहे, असं वाटणाऱ्या प्रत्येक भारतीयानं ती वाचली पाहिजे.'\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e- के. जे. अल्फान्स, खासदार, संस्कृती आणि पर्यटन खात्याचे माजी राज्यमंत्री\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'भवदीप कांग आणि नमिता काला यांनी एक खिळवून ठेवणारी कथा लिहिली आहे. ती एकाच वेळी क्लेशकारक आणि स्फूर्तिदायकही आहे. ही कथा समकालीन भारताचं समालोचन करते.'\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e- निरुपम सुब्रह्मण्यम, निवासी संपादक, द इंडियन एक्स्प्रेस\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'एका विलक्षण माणसाविषयी लिहिलेलं एक विलक्षण पुस्तक. प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवेत अशोक खेमका यांच्यासारखे हाताच्या बोटावर मोजता येतील इतके, अगदीच थोडे लोक आहेत. खरं म्हणजे, अशा अत्यल्प अधिकाऱ्यांमुळेच देशातील प्रशासनाची गंजकी लोखंडी चौकट अद्याप पूर्णपणे ढासळलेली नाही. आजच्या समाजात प्रामाणिक लोकांची संपूर्ण गळचेपी करता आली नाही, तर त्यांना निदान मूर्ख तरी नक्कीच समजलं जातं, त्यामुळेच समाजात अशा लोकांचा शोध घेणं वाढत्या प्रमाणात अवघड होत चाललं आहे.'\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपरणजॉय गुहा ठकुर्ता, पत्रकार, लेखक, प्रकाशक, शिक्षणतज्ज्ञ आणि अनुबोधपट निर्माता\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Bhavdeep Kang \/ Krishna Publication","offer_id":53645498482987,"sku":null,"price":399.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"25% Off \/ Namita Kala \/ Krishna Publication","offer_id":53645498515755,"sku":null,"price":399.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/ias.png?v=1780640066","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/eka-ias-adhikaryachi-sangharshkatha-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%be-ias-%e0%a4%85%e0%a4%a7%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}