{"product_id":"choreographer-nahi-nachanewali-कोरिओग्राफर-नही-नचानेवाली","title":"Choreographer Nahi Nachanewali  ( कोरिओग्राफर नही नचानेवाली )","description":"\u003cp\u003e\" मी मोठा होत गेलो तशा दोन गोष्टी घडल्या की मला माझी आयडेंटिटी लपवावीशी वाटायला लागली. म्हणजे तसं कुणी मला कधीच विचारलं नाही. पण माझं मलाच वाटायचं की 'बायको पळून गेलेल्या अमृते गुरुजींचा मुलगा' म्हणून लोक आपल्याकडे पाहत असणार. त्यातून मी केसांचा पोनी ठेवायला सुरुवात केली. जीन्स, टी-शर्ट घालायला सुरुवात केली, डोळ्यांना गॉगल लावायला लागलो. नंतर चष्मा लागल्यावर फोटोक्रोमॅटिक ग्लासेस वापरायला लागलो. त्या मायकेल जॅक्सनसारखं रूपडंच पार बदलून टाकलं...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e...आणि माझा आईचा शोध सुरूच राहिला. तशी मला आई अगदी नीट आठवत होतीच, पण आईचे काही फोटोदेखील मी मिळवले होते. पण ते दाखवून किंवा पेपरला त्या 'हरवली आहे' वगैरे जाहिराती असतात किंवा तेव्हा काहीतरी टीव्हीवरदेखील तशा जाहिराती यायच्या त्या द्यायची हिंमत नव्हती माझी. पण माझी नजर त्यामुळे भिरभिरती बनली!\"\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसोशल मीडियामुळे आजच्या जगण्यावर झालेले परिणाम, बदलती मूल्यं, मानसिकता व जाणिवा, नातेसंबंध यांची आणि झपाट्याने बदलत्या काळाची नस पडकणाऱ्या कथांचा संग्रह... कोरिओग्राफर नहीं... नचानेवाली !\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Satish Tambe \/ Rohan Prakashan","offer_id":53631547048235,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-06-01at2.37.19PM.jpg?v=1780304922","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/choreographer-nahi-nachanewali-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%93%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ab%e0%a4%b0-%e0%a4%a8%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}