{"product_id":"ai-ml-sarvansathi-ai-ml-सर्वांसाठी","title":"AI \u0026 ML Sarvansathi ( AI \u0026 ML सर्वांसाठी )","description":"\u003cp\u003eएआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग किंवा डीप लर्निंग हे शब्द अजूनही तुम्हाला परके किंवा दूरचे वाटत असतील, तर असे वाटणारे जगात तुम्ही काही एकटेच नाही आहात. अनेक जण या बदलाबाबत अनभिज्ञ आहेत किंवा त्यांना त्याविषयी केवळ जुजबी माहिती आहे. ते फक्त हा बदल चॅटजीपीटीसारख्या जनरेटिव्ह कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांपुरतेच मर्यादित जाणतात. कृत्रिम बुद्धिमत्तेचा आयाम यापेक्षा कितीतरी पटींनी व्यापक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता केवळ शास्त्रज्ञ किंवा तंत्रज्ञ यांच्यापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. जसे तुम्ही एके काळी संगणक किंवा स्मार्टफोन वापरायला शिकलात, तसेच कृत्रिम बुद्धिमत्तासुद्धा तुम्ही सहज वापरायला शिकू शकता. कदाचित, तुम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करतही असाल; परंतु त्याची तुम्हाला नेमकी जाणीव नसेल. त्यामुळेच कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमके काय, हे साध्या सोप्या भाषेत समजण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतंत्रज्ञानाची पार्श्वभूमी नसलेल्या, पण पत्रकारिता, शिक्षणक्षेत्राचा व्यासंग असलेल्या लेखकांनी सर्वसामान्य वाचकांसाठी लिहिलेले हे पुस्तक कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दलच्या साऱ्या शंकांचे सोप्या शब्दांत समाधान करते. क्लिष्ट संकल्पना सोप्या भाषेत मांडते. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, तिचा प्रभावी वापर कसा करावा, उत्तम प्रॉम्ट कसे लिहावेत, या क्षेत्रात कोणत्या संधी उपलब्ध होतील, याबाबत हे पुस्तक विश्वासार्ह माहिती देते. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकरी सुरक्षित राहील का, यापेक्षा कृत्रिम बुद्धिमत्ता शिकल्यामुळे आपल्याला कशा संधी उपलब्ध होतील हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. लक्षात घ्या, एआय तुमची जागा घेणार नाही; पण ज्याला एआयची माहिती आहे, तो नक्कीच घेईल.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Mayura BIjale \/ Vishwakarma Publication","offer_id":53763079110955,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/ai.png?v=1781513044","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/ai-ml-sarvansathi-ai-ml-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}