{"product_id":"रसीक-बलमा","title":"रसीक बलमा","description":"\u003cp\u003eकाय म्हणते ती? ऐसी भी बातें होती हैं. घेतलाय कधी असा अनुभव ? ऐसी भी बातें होती हैं. घेतला असो वा नसो. कसा असतो हा अनुभव, हेच सांगतं हे गाणं. आवाज खालच्या पट्टीत. स्वतःशीच कुजबुजताना कशाला चढवायचा आवाज ? त्यात पुन्हा 'कुछ भी नहीं' म्हणताना आणखी खाली. कधी कधी त्या 'नहीं' नंतर उगीच अस्फुट तान. 'कुठे काय, काहीच नाही, कुछ भी नही,' हेच जणू बजावणारी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपण स्वतःशी बोलताना सुचतं, असंच नसतं काही नेहमी. कधी क्वचित 'लेता है दिल अंगडाइयाँ'. तेव्हा कसा आवाज खाली राहील? तो दोन पायऱ्या, दोनच पायऱ्या वर चढेल. मग वर चढल्याचं लक्षात येऊन दचकेल. आणि खाली येईलः 'इस दिल को समझाये कोई'.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनीट ऐक गाणं. ती एकदाही चाल सोडून जात नाही. एकदाही गाण्याबाहेरचा उसासा टाकत नाही. आवाज चाल गातो. भरलेल्या कळशीतून पाणी डचमळावं, उचंबळून बाहेर यावं, तशा या आवाजातून भावना उचंबळतात. पण त्यांचा प्रवाह होत नाही. तिथल्या तिथे गुदमरतात. कसं शक्य आहे हे! याला का गाणं म्हणावं ? बंद खोलीत काळोख करून जर हे गाणं ऐकलं, तर आरपार जाईल आपल्यातून आणि आपण उरणारच नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e699 1500\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतिच्या मनात आलं, सेक्स पुरुषाला कळत नाही. तो आपला वीर्य सोडून मोकळा होतो आणि हुश्श! झालं सेक्स. मुळात मराठीत धड शब्द नाही. संभोग, शरीरसंबंध, जुगणे, झवणे, सेक्स. काय बेकार शब्द आहेत ! भाषेवर बऱ्यापैकी बायकांची मालकी असते. पण या एका बाबतीत बायका चिडीचूप. मग बाई म्हणून आपण कुठला शब्द वापरू? तिला चटकन शब्द सुचलाः समर्पण. तो तिला आवडला. त्यात त्या अनुभवाची किंचितशी झाक आहे, असं तिला वाटलं. पण समर्पण हा शब्द बाहेर इतर संदर्भात जेव्हा वापरला जातो, तेव्हा त्याला भलभलता अर्थ चिकटतो की. नारीची एकदम सीता होऊन जाते. रामाला समर्पित ! हॅट !\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"215% Off \/ Hamant Karnik \/ Akshar Prakashan","offer_id":53920741884203,"sku":null,"price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-06-25at17.13.03.jpg?v=1782387834","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%80%e0%a4%95-%e0%a4%ac%e0%a4%b2%e0%a4%ae%e0%a4%be","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}