{"product_id":"आधुनिक-भारताचे-शिल्पकार-पंडीत-जवाहरलाल-नेहरु","title":"आधुनिक भारताचे शिल्पकार पंडीत जवाहरलाल नेहरु","description":"\u003cp\u003eआधुनिक भारताचे शिल्पकार : पंडित जवाहरलाल नेहरू\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआधुनिक भारताच्या शिल्पकारांच्या श्रेयनामावलीत पंडित जवाहरलाल नेहरूंचा समावेश अग्रक्रमाने केला आहे. कारण त्यांनीच देशाला आधुनिकतेचा तोंडावळा दिला. १९५९ साली परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांसमोर बोलताना पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते, लक्षात ठेवा, भारताला खरा धोका साम्यवादाचा नाही, तर तो कडव्या हिंदू जातीयवादाचा आहे. आज हा इशारा खरा ठरताना दिसत आहे. धर्म, भाषा, रीतिरिवाज, जीवनशैली विभिन्न असणारा भारत एकात्म व्हावा आणि त्यासाठी देशातील लोक मनाने एक झाले पाहिजेत यासाठी जवाहरलाल नेहरूंनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारताचा प्राचीन आणि वैभवशाली वारसा जतन करतानाच संविधानाधिष्ठित देशाचे आधुनिक राष्ट्रात रूपांतर करण्याची कसरत पंडित जवाहरलाल नेहरूंना करावी लागली. विचार, वर्तन आणि धोरणात संविधानवादी असणाऱ्या नेहरूंची प्रतिभा असामान्य होती. परंतु आज त्यांची प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न वाढताना दिसत आहेत. या प्रतिमाभंजनाच्या काळात नेहरूंची सर्वकष चर्चा करणाऱ्या पुस्तकाची गरज होतीच. हे पुस्तक केवळ विरोधकांना भानावर आणण्यासाठी किंवा नेहरू विरोधकांचा तर्कशुद्ध, वस्तुनिष्ठ प्रतिवाद करण्यासाठी नसून पंडित जवाहरलाल नेहरूंचे बहुआयामी जीवन आणि विचारविश्व उलगडून दाखवण्यासाठी आहे. यातून नेहरूंना आजच्या सामाजिक आणि राजकीय वास्तवाशी जोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न लेखकाने केला आहे. या तेजस्वी योध्याची आधुनिकता आणि विज्ञाननिष्ठा, धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद आणि समाजवादी लोकशाहीशी असणारी कटिबद्धता लेखक जगदीश काबरे यांच्या या पुस्तकातून अधोरेखित झाली आहे. नेहरूंची पुनर्भेट अनेक\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंदर्भासह त्यांनी घडवून आणली आहे, ही या पुस्तकाची जमेची बाजू आहे. - डॉ. शमसुद्दिन तांबोळी (अध्यक्ष, मुस्लीम सत्यशोधक मंडळ)\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Akshar Prakashan","offer_id":53920736575787,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-06-25at17.07.15.jpg?v=1782387481","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/%e0%a4%86%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%9c%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a5%81","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}