The House Of Paper By Abhishek Dhangar

Rs. 350.00

In Stock

Shubham Sahitya

या कादंबरीतल्या नायकाबद्दल वाचत असताना तुम्ही जर चोखंदळ वाचक असाल, तर या कादंबरीतल्या बऱ्याच गोष्टींशी तुम्ही आपसूक रिलेट होत जाल. एका संध्याकाळी कार्लोसचा मित्र त्याला भेटायला त्याच्या घरी जातो, तेव्हा कार्लोसच्या हातात एक वाईनचा ग्लास असतो आणि समोरच्या टिपॉयवर ‌‘डॉन किहोते‘ची उत्कृष्ट प्रत ठेवलेली असते आणि त्या प्रतीच्या शेजारीच आणखीन एक वाईन भरलेला ग्लास असतो म्हणजेच कार्लोस त्या पुस्तकांसोबत डिनर घेत असतो. अशा कितीतरी गोष्टींशी पट्टीचा वाचक सतत रिलेट होत असतो. कार्लोस ब्रॉअर, त्याचं पुस्तक, त्याचा संग्रह, त्याचा एकटेपणा, विक्षिप्तपणा, सतत पुस्तकांच्या सान्निध्यात राहण्याची त्याची सवय, एखाद्या अतिशय आवडत्या कादंबरी सोबत जगण्याची असोशी हे सगळं तुम्हाला कदाचित ओळखीचं वाटू शकेल. पुस्तकांची, पुस्तकांच्या माणसांची, पुस्तकांच्या गूढ असण्या–नसण्याची ही कादंबरी वाचताना या कादंबरीतली काही वाक्यं इथे उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही. या कादंबरीची मांडणी एखाद्या थ्रिलरसारखी आपल्याला धरून ठेवते. शिवाय तिची मांडणी अत्यंत पोएटिक वाटते.

Author:

Publication:

 

img

Added to cart successfully!